यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील किनगाव बुद्रुक गावात चुंचाळे रस्त्यावर एका २५ वर्षीय तरुणाला गावातीलच एकाने दारूची बाटली आणून दे असे सांगितले. त्याने हे काम करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून या तरुणाला एकाने शिवीगाळ करून मारहाण करून जबर दुखापत केली. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, किनगाव बुद्रुक, ता. यावल या गावात चुंचाळे रोडवर पंकज सुरेश पाटील (वय २५) हा तरुण उभा असताना तेथे गणेश मोहन चौधरी हा आला व त्याने पंकजला दारूची बाटली आणून देण्यास सांगितली असता त्याने नकार दिला. नकार दिल्याचा राग येऊन पंकजला गणेश चौधरी याने शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्याच्या दोन्ही पायांना बल्लीने मारून दुखापत केली. डोक्यावरही वार केला. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहेत