जळगाव : प्रतिनिधी
पुणे येथील नातेवाइकांकडील कार्यक्रम आटोपून बडनेरा येथे परताना संध्या चंद्रकांत राठी (६९, रा. अमरावती) या वृध्देच्या पर्समधून १० हजार रुपयांसह ११ लाख ९५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबविले. ही घटना १ जानेवारी रोजी महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये घडली. या प्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अमरावती येथील संध्या राठी यांच्या नातेवाईकांकडे पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. तेथे त्यांच्यासह पती डॉ. चंद्रकांत राठी व अन्य दोन नातेवाईक गेले होते. तेथून ते ३१ जानेवारी रोजी रात्री महाराष्ट्र एक्स्प्रेसने बडनेरापर्यंत आले. त्यावेळी त्यांनी आजूबाजूला शोध घेतला, मात्र ऐवज न सापडल्याने त्यांनी रेल्वेच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविली. तसा संदेश रेल्वे नियंत्रण कक्षातून लोहमार्ग पोलिसांना मिळताच जळगाव स्थानकावरील रेल्वे पोलिस चौकीचे पोहेकॉ सचिन भावसार यांनी जळगाव स्थानकावर महाराष्ट्र एक्स्प्रेस आल्यानंतर तक्रार नोंदवून घेतली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
साखळी, मंगळसूत्र, झुमके गायब
प्रवासामध्ये संध्या राठी यांनी सोबत असलेले तीन व दुसरी दोन तोळ्याच्या सोन्याच्या दोन दोन चैन, डायमंड मंगळसूत्र, कानातील आठ तोळ्याचे झुमके, पाच ग्रॅमचे टॉप्स व रोख १० हजार रुपये एका बॉक्समध्ये ठेवून ते पर्समध्ये ठेवले. रात्री झोपताना त्यांनी ही पर्स बर्थवर स्वतः जवळच ठेवली होती. सकाळी सात वाजेच्या सुमारास पाचोरा स्थानकापूर्वी त्यांनी पर्स पाहिली असता त्यात रोकड व दागिने सापडले नाही.