जळगाव : प्रतिनिधी
एका धार्मिक मिरवणुकीमध्ये डीजेवर वादग्रस्त ऑडिओ क्लिप वाजवण्यासह औरंगजेबचे छायाचित्र घेऊन नाचत असल्याचा प्रकार २३ जानेवारी रोजी रात्री तांबापुरा परिसरात घडला. याप्रकरणी १ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा आहे. दाखल करण्यात आला
सविस्तर वृत्त असे कि, तांबापुरा परिसरातील एका चौकात धार्मिक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मिरवणुकीत नेत्याचे वादग्रस्त एका पक्षाच्या वक्तव्य असलेली ऑडिओ क्लिप डीजेवर लावण्यात आली होती. तसेच औरंगजेबचे हातात छायाचित्र घेऊन एकजण मिरवणुकीत नाचत होता. याप्रकरणी किशोर रवींद्र जाधव (३२, रा. समतानगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यावरून मिरवणूक आयोजक अशरफ शेख शकील, डीजेमालक योगेंद्र पाटील उर्फ विकी (रा. भुसावळ), औरंगजेबचे छायाचित्र घेऊन नाचणारा शेख मुजाहीद शेख जाकीर (रा. तांबापुरा) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत.