जळगाव : प्रतिनिधी
शहराकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या प्रवासी रिक्षाने समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वार बापलेकाला जोरादार धडक दिली. या अपघातात मगन छगन ढगे (वय ८३) यांच्यासह त्यांचा मुलगा दिनेश मगन ढगे (दोघ रा. रेलगाव, ता. सिल्लोड, जि. संभाजी नगर) हे दोघ गंभीर जखमी झाले. ही घटना दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी कुसुंबा शिवारातील विमानतळ इन गेट समोर घडली. यापक्ररणी रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील रेलगाव येथील मगन छगन ढगे हे दि. ३१ जानेवारी रोजी मुलगा दिनेश ढगे यांच्यासोबत सकाळी ८ वाजता (एमएच २०, डीएम ७८७४) क्रमांकाच्या दुचाकीने धार्मीक कार्यक्रमासाठी जळगाव तालुक्यातील रायपूर येथे येत होते. कुसुंबा शिवारातील विमानतळाच्या इन गेटसमोरुन जात असतांना, जळगावकडून कुसुंबाकडे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच १९, जे ८५९१) क्रमांकाच्या रिक्षाने जोरदार धडक दिली.
या अपघातात मगन ढगे यांच्या डोक्याला आणि पायाला तर त्यांच्या – मुलाला गंभीर दुखापत होवून ते जखमी झाले. दरम्यान, रिक्षा – चालक हा कोणतीही मदत न करता तेथून पळून गेला होता. दरम्यान, मगन ढगे यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. – त्यानुसार रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ मुकुंद पाटील करीत आहे.