यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील किनगाव येथील मनीषा संदीप पाटील (वय ३२) या विवाहितेने या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनीषा पाटील या घरी असताना त्यांच्याशी जवळचे संबंध असलेला मुकुंदा गणेश भंगाळे (वय ३२, रा. डांभुर्णी) हा तरुण त्यांच्या घरात आला.
तो त्या महिलेला म्हणाला की, मी तुमच्या मोबाईलवर कॉल केला, तूम्ही माझा कॉल का उचलला नाही. तेव्हा या महिलेने सांगितले की, माझा मोबाईल सायलेंट मोडवर होता आणि मी बाहेर गेली होती. तरी ही मुकुंदा भंगाळे याने मनीषा पाटील या महिलेशी वाद घातला आणि महिलेला थेट शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीवर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. या प्रकरणी मनीषा पाटील या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात मुकुंदा भंगाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.