जळगाव : प्रतिनिधी
महाविद्यालयातून टहाकळी येथे दुचाकीवर मागे बसून जात असताना मालवाहू वाहनाने धडक दिल्यामुळे जखमी झालेल्या महेश संजय पाटील (१८, रा.टहाकळी ता. धरणगाव) या विद्यार्थ्यांचा उपचारादरम्यान शुक्रवारी (३१ जानेवारी) मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील टहाकळी येथील महेश पाटील हा पाळधी येथील नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी (एनएमकेसी) महाविद्यालयात डिप्लोमाचे शिक्षण घेत होता. २३ जानेवारी रोजी दुपारी तो महाविद्यालयातून घरी पायी निघाला असताना त्याच्या गावातील एक जण कंपनीतून दुचाकीने घरी जात होते. त्यावेळी त्यांनी महेशला दुचाकीवर बसवून घेतले. महामार्गावर मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीलाजोरदार धडक दिली. त्यात महेश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना शुक्रवारी (३१ जानेवारी) त्याचा मृत्यू झाला