जळगाव : प्रतीनिधी
तालुक्यातील एका गावामध्ये परप्रांतीय १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तरुणाने गेल्या दोन वर्षांपासून अत्याचार केला. यातून ती मुलगी गर्भवती राहून तिने एका बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ३० जानेवारी रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात चमासिंग बिलाला (२२, रा. भादली खुर्द, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील एक कुटुंब तालुक्यातील एका गावात कामानिमित्त आले आहे. या कुटुंबातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चमासिंग याने गेल्या दोन वर्षांपासून अत्याचार केला. या अत्याचारातून ही मुलगी गर्भवती राहिली. तिने एका बाळाला जन्म दिला. याप्रकरणी पीडित मुलीने नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चमासिंग बिलाला याच्याविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउ. निरीक्षक गणेश देशमुख करीत आहेत.