यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील दहिगाव येथील माहेर असलेल्या २९ वर्षीय विवाहितेचा कार घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावे म्हणून छळ करण्यात आला. याचबरोबर मुलगा झाला नाही असा आरोप करत त्रास देण्यात आला. पैसे आणले नाही म्हणून तिला माहेरी सोडून देण्यात आले याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात पारोळा येथील पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील दहिगाव येथील माहेर असलेल्या शलाका सुयोग जैन या विवाहितेने यावल पोलिसांत फिर्याद दिली आहे. तिचा विवाह सुयोग रवींद्र जैन (रा. बालाजी मंदिराजवळ, रथ गल्ली, पारोळा) याच्यासोबत झाला. विवाहानंतर पती सुयोग जैन, सासरे रवींद्र जैन, सासू पुष्पा जैन तसेच नंदोई रोशन लखीचंद जैन, नणंद श्रद्धा रोशन जैन (दोन्ही रा. ठाकरे हॉस्पिटल जवळ, धुळे) व नणंद श्वेता धीरज जैन व नंदोई धीरज किरणलाल जैन (रा. नाशिक) या सात जणांनी कार घेण्यासाठी पाच लाख रुपये आणावे म्हणून तिचा छळ केला.
याचबरोबर मुलगा झाला नाही असे म्हणत तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. पैसे आणले नाही म्हणून माहेरी सोडून दिले. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अमित तडवी करीत आहेत.