जळगाव : प्रतिनिधी
गिलियन बरे सिड्रोम या नव्या आजाराची पहिली महिला रुग्ण जळगाव शहरात आढळून आली आहे. ४५ वर्षीय महिलेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आयसीयू कक्षात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील औषध व वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पाराजी बाचेवार या महिलेवर उपचार करीत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी या महिलेच्या पायात थकवा जाणवत होता. त्यानंतर तिला उलट्या व जुलाबचा त्रास सुरू झाला.
गुरुवारी रात्री तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी एमआरआय, रक्त तसेच मेंदूतील पाण्याची तपासणी करण्यात आली. शुक्रवारी दुपारी त्याचा अहवाल प्राप्त झाला असता, त्यात जीबीएस हा आजार असल्याचे निदान झाले. हा आजार गंभीर नसून एक लाख लोकांमधून एक ते दोन जणांनाच आढळून येत आहे. पुणे, नागपूर नंतर जळगावात या आजाराचा रुग्ण आढळून आला. या आजाराचा रुग्ण डिसेंबरमध्येही आढळला होता, उपचार करून तो घरीही परतल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय सुत्रांनी केलेल आते