धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पष्टाणे खुर्द येथे धरणगाव येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विशेष श्रमसंस्कार शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
धरणगाव येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे ५ मार्च ते ११ मार्च यादरम्यान पष्टाने खुर्द या गावात करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन भारतीय लष्करातील माजी सैनिक किशोर पाटील यांच्या हस्ते आणि प.रा. हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच व इतर सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
या सोबतच पष्टाणे खुर्द चे माजी सरपंच श्री किशोर निकम व ग्रामस्थ उपस्थित होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त दत्तक गावात अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. माझे गाव कोरोना मुक्त गाव अंतर्गत , कोरोना बाबत जनजागृती, जलसंधारण कामे, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ग्रामस्वच्छता अभियान, असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाला परा हायस्कुल सोसायटीचे सचिव डॉ.मिलिंद डहाळे, संचालक अजयशेठ पगारिया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एस. बिराजदार, उपप्राचार्य प्रा. डॉ. के.एम पाटील सर्व प्राध्यापक सहकारी उपस्थित होते.
शिबिराच्या उदघाटन सत्रात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. कैलास महाजन, पत्रकार श्री. विजय पाटील आणि श्री. अजय पाटील यांनी स्वयंसेवकांना त्यांचे अनुभव सांगून एनएसएसचे फायदे सांगितले. तसेच विविध गीते, घोषणा आणि खेळाद्वारे शिबिरार्थींचा उत्साह वाढविला. शिबिर उदघाटन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक बोंडे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. छाया सुखदाने, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. अभिजीत जोशी आणि डॉ. गौरव महाजन, संजय तोडे यांनी परिश्रम घेतले.