Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महंत नामदेव शास्त्री यांचे मोठे वक्तव्य : मंत्री मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा !
    क्राईम

    महंत नामदेव शास्त्री यांचे मोठे वक्तव्य : मंत्री मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा !

    editor deskBy editor deskJanuary 31, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बीड : वृत्तसंस्था

    राज्यातील बीड खून प्रकरणी सर्वच विरोधकांनी अजित पवारांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर आता मंत्री मुंडे समर्थक हे आक्रमक झाले आहे. तर आता भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी देखील मंत्री मुंडे यांची बाजू मांडली आहे.

    नामदेव शास्त्री म्हणाले कि, धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा असून त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. धनंजय मुंडे हा खंडणी घेऊन जगणारा मुलगा नाही, अशा शब्दात नामदेव शास्त्री यांनी मुंडेंची बाजू मांडली आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड यांची पाठराखण करत असल्याचा आरोप धनंजय मुंडेंवर केला जातोय. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे हे काल भगवानगड येथे मुक्कामी गेले होते. यादरम्यान मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली. त्या नंतर नामदेव शास्त्री यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

    या संदर्भात नामदेव शास्त्री म्हणाले की, संतांनी इतक्या वर्षांपासून जातीवाद नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ते घडवून देखील आणले होते. मात्र, काही राजकीय लोकांनी तो पुन्हा बाहेर काढला असल्याचे मला वाटते. यातून सामाजिक सलोखा बिघडला असल्याचा दावा देखील नामदेव शास्त्री यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. या सर्वांचा समाजावर भयंकर परिणाम झाला आहे. ज्या व्यक्तीला जातीवाद माहिती नाही, त्यालाही तो माहिती झाला. त्यामुळे कायमस्वरुपी सामाजिक सलोखा बिघडला असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. संत ज्ञानेश्वरांपासून आजपर्यंत सर्व संतांनी जातीय सलोखा ठेवण्यासाठी जो प्रयत्न केला त्या प्रयत्नावर आघात झाला असल्याचा दावा देखील नामदेव शास्त्री यांनी केला आहे.

    धनंजय मुंडे यांची मानसिक स्थिती मी जाणून घेतली असल्याचा दावा नामदेव शास्त्री यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांच्या हाताला सलाईन लावलेली असल्याचा दावा देखील नामदेव शास्त्री यांनी केला आहे. धनंजय मुंडे गुन्हेगार व्यक्ती नाहीत. त्यांची पार्श्वभूमी देखील तशी नाही. तो एक राजकीय घराण्यातील व्यक्ती आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या घराण्यातील व्यक्ती आहे. ते खंडणी घेऊन जगणारे व्यक्ती नसल्याचे नामदेव शास्त्री यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. ते शंभर टक्के गुन्हेगार नाहीत, हे मी ठामपणे सांगू शकतो, असे देखील नामदेव शास्त्री यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत याची पक्षातील नेत्यांना देखील जाणीव आहे, असा दावा देखील नामदेव शास्त्री यांनी केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.