जळगाव : प्रातिनिधी
मुंबई येथून रेल्वेने प्रवास करत असताना अचानक त्रास होवू लागल्याने कृष्णा देवधारी पासवान (वय ५२, रा. टिकर रा. झारखंड) या परप्रांतीय प्रौढाचा मृत्यू झाला. घटना गुरुवार दि. ३० जानेवारी रोजी सकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा पासवान हे मुंबई येथून बिहार राज्यातील गया येथे जाण्यासाठी त्यांचा मुलासोबत गुरुवार दि. ३० जानेवारी रोजी सकाळी ६.१५ सुमारास हावडा एक्सप्रेस यामधून प्रवास करीत होते. अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. लागल्याने जागेवरच मृत्यू झाला. त्यांना जळगाव येथील रेल्वे स्थानक येथे उतरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास रेल्वे पोलीस कर्मचारी नरेंद्र चंदन हे करीत आहे.