• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एमआयडीसीतील प्रभात रेस्टारंट येथे सीसीटीव्ही दाखविण्याच्या कारणावरून तिघांना मारहाण

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 4, 2022
in क्राईम, जळगाव
0
एमआयडीसीतील प्रभात रेस्टारंट येथे सीसीटीव्ही दाखविण्याच्या कारणावरून तिघांना मारहाण

जळगाव प्रतिनिधी । सीसीटीव्ही चेक करण्याच्या कारणावरून तीन जणांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना एमआयडीसी हद्दीतील प्रभात रेस्टॉरंट येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, महेश विष्णू मोरे रा. रिंगरोड जळगाव यांचे एमआयडीसी हद्दीतील सर्वोदय पेट्रोल पंपाच्या बाजूला प्रभात रेस्टॉरंट आणि भरती सेंटर नावाचे दुकान आहे. दुकानावर त्यांचे मेहूण हेमंत पुरूषोत्तम पाटील रा. गुरूकुल सोसासटी जळगाव हे देखील काम पाहतात. सोबत वेटर हर्षद पटेल आणि विज नावाचे कामगार हे त्यांना मदत करतात. हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहे. गुरूवारी ३ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास धुकडू सपकाळे (पुर्ण नाव माहिती नाही) हा हॉटेलमध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे पहायचे असल्याचे त्यानुसार दुकानातील माणसांनी त्यांनी सीसीटीव्ही दाखवत होते. त्यावेळी महेश मोरे हे दुकानावर आल्याने त्यांना सीसीटीव्ही फुटेज का दाखवत आहे असे त्यांच्या दुकानातील माणसांना ओरडले. दरम्यान याचा राग धुकडू सपकाळे याला आल्याने त्याने दुकानातील सर्वांना शिवीगाळ व मारहाण केली. आणि दुकानातील सर्व सामानांची तोडफोड करण्याची धमकी दिली. भांडणाचा आवाज आल्याने हेमंत पाटील हे दुकानावर आले असता धुडकू सपकाळे आणि सोबत असलेले दोन अनोळखी व्यक्तींनी लाकडी दांडक्याने हेमंत पाटील यांना डोक्यावर मारले. त्यात ते जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी महेश मोरे यांच्या फिर्यादीवरून रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात धुडकू सपकाळे आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.

Previous Post

बिलवाडी गावात दारू विक्री रोखण्यासाठी महिला आक्रमक

Next Post

धरणगाव येथील महाविद्यालयात रासेयो अंतर्गत पष्टाणे खुर्द येथे श्रमसंस्कार शिबीराचे उद्घाटन

Next Post
धरणगाव येथील महाविद्यालयात रासेयो अंतर्गत पष्टाणे खुर्द येथे श्रमसंस्कार शिबीराचे उद्घाटन

धरणगाव येथील महाविद्यालयात रासेयो अंतर्गत पष्टाणे खुर्द येथे श्रमसंस्कार शिबीराचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group