Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज्यात प्रथमच जळगावात रंगणार ‘पत्रकार प्रीमियर लीग’
    जळगाव

    राज्यात प्रथमच जळगावात रंगणार ‘पत्रकार प्रीमियर लीग’

    editor deskBy editor deskJanuary 30, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    समाजाचा चौथा आधारस्तंभ असलेले पत्रकार नेहमीच जीवाची बाजी लावत, ऊन, वारा, पाऊस, थंडी सहन करीत दिवसरात्र धावपळ करीत असतात. गेल्या वर्षभराच्या कालावधीत दोन मोठ्या निवडणुका पार पडल्या. सणोत्सव आटोपल्यावर विविध धर्म, जात, शासकीय, निम शासकीय कार्यालयातर्फे क्रिकेटसह इतर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सर्वच आपला विचार करतात मात्र पत्रकारांचा कुणीही विचार करत नाही. पत्रकारांच्या मनोरंजनासाठी आणि जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या पत्रकारांना एकत्र करण्याच्या उद्देशाने राज्यात प्रथमच जळगाव शहरात पत्रकार प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे.

    पत्रकार प्रीमियर लीगबाबत माहिती देण्यासाठी गुरुवार दि.३० रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी आयोजक वाल्मिक जोशी, किशोर पाटील, चेतन वाणी, वसीम खान, सचिन गोसावी, जकी अहमद आदी उपस्थित होते. माहिती देताना त्यांनी सांगितले की, आम्ही पत्रकारांच्या मनोरंजनासाठी आणि कल्याणासाठी उपक्रम राबविण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहोत. याच अनुषंगाने, आम्ही दि.१०, ११, १२ फेब्रुवारी रोजी शिवतीर्थ मैदान याठिकाणी पत्रकार प्रीमियर लीग आयोजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा जिल्हाभरातील पत्रकारांना एकत्र करून खेळली जाणार आहे. स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील पत्रकारांचा एक संघ असणार आहे. पत्रकारांमधील सुसंवाद, खेळण्याची वृत्ती आणि मैत्री वाढवण्यासाठी स्पर्धेतून एक उत्तम संधी निर्माण होईल, असा आम्हाला विश्वास आहे.

    पत्रकारांचे २० तर शासकीय ४ संघांचा सहभाग
    स्पर्धेत जिल्ह्यातील पत्रकारांचे १४, जळगाव शहरातील ५, संपादक असे एकूण २० तर लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासनाचा संघ असे २४ संघ सहभागी होणार आहे. ३ दिवसीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंकडून एकही रुपया घेतला जाणार नाही. समारोप सोहळ्यात ट्रॉफीसह हजारो रुपयांची बक्षिसे दिली जाणार असून स्पर्धा सर्वोत्तम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    पत्रकारांनी सहकार्य करावे
    पत्रकारांनी पत्रकारांसाठी आयोजित केलेला हा पहिलाच उपक्रम असून आम्हाला आपल्या सर्वांचे सहकार्य आणि अनमोल मार्गदर्शन आवश्यक आहे. आपला अनुभव आणि सहकार्य आम्हाला स्पर्धेचे पहिले पर्व यशस्वी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. स्पर्धेसाठी तालुक्यातून नावे मागवण्यात आली असून प्रत्येक संघात १३ खेळाडूंचा सहभाग असणार आहे. प्रत्येक सामना ८ षटकांचा राहणार असून टेनिस बॉलवर खेळला जाईल. तरी सर्व पत्रकारांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जिथे सनई वाजणार होती… तिथेच पसरली शोककळा; अपघातात पित्याचा अंत

    March 14, 2026

    गॅस टंचाईचा फटका शिर्डीत; साई भक्तांना आता फक्त एकच लाडू प्रसाद

    March 14, 2026

    जुन्या वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला !

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.