चाळीसगाव : प्रतिनिधी
कामगार नेते भास्कर हरी चव्हाण (६८) यांचे मंगळवारी (दि. २८) प्रयागराज येथे कुंभमेळ्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, भास्कर चव्हाण हे आठ ते दहा जणांसोबत दोन दिवसांपूर्वी प्रयागराज येथे गेले होते. मंगळवारी सकाळी त्यांनी संगमावर स्नान केले. यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव बुधवारी (दि. २९) सायंकाळी प्रयागराज येथून चाळीसगाव येथे आणण्यात आले. त्यानंतर अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.