• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मध्यरात्री तहसीलदारांची धडक कारवाई : वाळूचे तीन ट्रॅक्टर पकडले

editor desk by editor desk
January 30, 2025
in क्राईम, जळगाव, राज्य, रावेर
0
अवैध वाळू भरलेले ट्रॅक्टर पळविले !

मुक्ताईनगर : प्रतिनिधी

तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील पूर्णा नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा करून तस्करी करत असलेल्या वाळू – माफियांवर महसूलच्या पथकाने धडक कारवाई करत तीन ट्रॅक्टर पकडले. त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.

मळलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे यांच्या नेतृत्वात महसूल विभागाचे पथक वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी गस्त घालत असताना रिगाव येथून सुलेमार्गे वढोदा येथे वाळूची वाहतूक करत असलेले तीन ट्रॅक्टर त्यांच्या नजरेस पडले. यावेळी पथकाने त्यांना अडवले असता ट्रॅक्टर चालक पळून गेले. यावेळी तहसीलदार गिरीश वखारे यांनी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जयेश पाटील यांना माहिती देऊन पोलिस सहकार्य मागितले. त्यानुसार कुऱ्हा पोलिस चौकीचे सहायक फौजदार संतोष चौधरी, पोलिस नाईक हरीश गवळी, पो.कॉ. अंकुश बावस्कर, पो. कॉ. अनिल देवरे यांनी घटनास्थळी जाऊन तिन्ही ट्रॅक्टर कुऱ्हा पोलिस चौकीत आणले.

तपासणी केली असता वर्षा ईश्वर भोंगरे, रा. निमखेडी बु. यांचे मालकीचे एक व गणेश रमेश बेलदार, रा. रिगाव यांचे मालकीचे दोन असे तीन ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आल्याने हे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. पथकात तलाठी काळे, खैरनार, बोराटकर, सोनवणे, अमित इंगळे, वैभव काकडे, महसूल सहायक प्रशांत सावकारे, किरण बावस्कर यांचा समावेश होता. जप्त केलेल्या ट्रॅक्टर मालकांविरुद्ध प्रत्येकी एक लाख बारा हजारांचा दंड प्रस्तावित केला आहे.

Previous Post

दुचाकी घसरली जखमी बालकाचा तीन दिवसाने दुर्देवी मृत्यू

Next Post

डोक्यावर कर्जाचा बोजा : शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

Next Post
डोक्यावर कर्जाचा बोजा : शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

डोक्यावर कर्जाचा बोजा : शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group