प्रतिनिधी प्रविण पाटील । तालुक्यातील बिलवाडी गावात दारू विक्री बंद करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून महिलांची मागणी होती. दरम्यान आज शुक्रवारी गावातील महिला एकत्र येवून दारू बंदीसाठी आक्रम पवित्रा घेतला आहे.
याबाबत माहिती अशी की, बिलवाडी हे गाव औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशनच्या हद्दीतील म्हसावद पोलिस चौकीच्या कार्यक्षेत्रात येणारे छोटेसे गाव आहे. याठिकाणी गावठी दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने येथील तरुण तसेच नागरीक हे दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होत असल्याचे येथील महीलांची तक्रार आहे. त्यासाठी गावातील महिला एकत्र आल्या व त्यांनी गावठी दारुची विक्री बंदसाठी आक्रमक भूमिका घेत दारु विक्रेत्यांना दारु न विकण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्या सोबत ग्रामपंचायत सदस्य तसेच पोलिस पाटील यांचाही उपस्थिती होती. यावरून पुन्हा म्हसावद पोलिस स्टेशनच्या हद्दीतील दारु तसेच अवैध धंदे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे तरी पोलिस विभागाने वेळीच लक्ष देऊन या परीसरात सुरू असलेले अवैध धंदे त्वरित बंद करावीत अशी मागणी नागरिकांकडून होतांना दिसते.