जळगाव : प्रतिनिधी
काथार कंठहार वाणी समाजसेवा संघ, जळगांव यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या वाणी प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धा 24, 25 आणि 26 जानेवारी या तीन दिवसांमध्ये मानराज पार्क मैदान प्रिंराळा येथे भरवण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये 10 पुरुष संघ व दोन महिला संघांनी सहभाग नोंदवला होता. यात पुरुष संघांमध्ये यंगर्स क्रिकेट क्लब यांनी विजेतेपद पटकावले तर उपविजेतेपद हे फ्रेंड सर्कल या संघाने मिळवले तर दुसरीकडे काथार 11 या संघाने महिला विजेतेपद पटकावले तर जय 11 यांना उपविजेता पदावर समाधान मानावे लागले.
गेल्या तीन दिवसात वाणी प्रीमियर लीग मध्ये एकूण 24 सामने खेळण्यात आले. सर्वच सामने हे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये व निर्विघ्नपणे पार पडले. यावेळेस मागील पर्वापेक्षा या पर्वात अधिक चांगल्या पद्धतीचे नियोजन बघायला मिळाले व अधिक चांगल्या व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर देखील या स्पर्धेमध्ये करण्यात आला होता जसे की सर्व सामान्यांचे यु ट्यूब लाईव्ह प्रक्षेपण, थर्ड अंपायर, रिव्ह्यू सिस्टीम चा वापर तसेच व्यवसायिक समालोचन इत्यादी बाबी समाविष्ट होत्या.
स्पर्धा यशस्वी व्हावी म्हणून सर्व आयोजकांनी गेल्या महिनाभर अथक परिश्रम घेतले होते. यात मैदान व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, भोजन व्यवस्था तसेच सामान्यांच्या वेळेचे नियोजन, स्पर्धेसाठी फंड गोळा करणे असे अनेक काम चोखपणे पार पाडण्यात आले. सर्व कार्यकरणी सदस्य तसेच वाणी समाजातील सर्व सन्माननीय पदाधिकारी व वाणी प्रीमियर लीगचे सर्व सभासदयांचे खूप मोलाचे सहकार्य लाभल्यामुळे दुसरे पर्व यशस्वी झाले तचेच बक्षीस वाटप कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अमर भाऊ जैन यांनी आपले मत व्यक्त केले.