• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

काही काळापासून प्रलंबित कामे मार्गी लागणार !

आजचे राशिभविष्य दि.२९ जानेवारी २०२५

editor desk by editor desk
January 29, 2025
in राशीभविष्य
0
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !

मेष : श्रीगणेश म्‍हणतात, आज अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन तुम्‍हाला लाभेल. मनात काही काळापासून सुरू असलेला कोणताही संघर्ष संपेल. प्रतिकूल परिस्थितीत शांतता आणि संयम राखा; कोणतेही काम घाईघाईने आणि निष्काळजीपणे करू नका. व्यावसायिक कामांमध्ये काळजी घेणे आवश्यक आहे. तरुणांना नवीन रोजगाराच्या संधी मिळतील.

वृषभ : श्रीगणेश सांगतात की, आज आर्थिकदृष्ट्या काही अडचणी आणि समस्या येऊ शकतात. तसेच तुम्हाला त्याचे निराकरण देखील मिळेल. तरुणांनी आपल्‍या करिअरबाबत गंभीर राहावे. व्यवसाय उत्पादन क्षमतेत वाढ होईल. वरिष्ठांशी वाद घालू नका.

मिथुन : स्थलांतराशी संबंधित विचार असेल तर विशेष काळजी घ्‍या. मित्राचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. तुमच्या कामात व्यस्त रहा आणि निरुपयोगी कामांमध्ये रस घेऊ नका. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचा अनुभव तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. जनसंपर्काची व्याप्ती वाढवल्याने कार्यक्षेत्रात प्रगती होईल.

कर्क : गेल्या काही काळापासून सुरू असलेले कौटुंबिक वाद मिटल्यामुळे घरात आनंदी वातावरण असेल. वैयक्तिक कामावर लक्ष केंद्रित करू शकाल, कोणावरही लवकर विश्वास ठेवू नका आणि स्वतःच्या निर्णयाला प्राधान्य द्या. घाई आणि अतिउत्साह देखील केलेले काम बिघडू शकते. व्यवसायात कामाच्या मार्केटिंगवर लक्ष केंद्रीत करा.

सिंह : श्रीगणेश म्‍हणतात की, ग्रहांचे संक्रमणामुळे तुमची कार्यक्षमता वाढत आहे. स्वतःला श्रेष्ठ समजणे नुकसानकारक ठरेल. कोणताही निर्णय घाई गडबडीत घेऊ नका. कोणतेही नवीन काम सुरू करू नका. कामात तुमच्या जोडीदाराचा सल्ला घ्या.

कन्या : आज सकारात्‍मक आणि संतुलित वर्तनाने प्रतिकूल परिस्‍थितीतही योग्य सुसंवाद राहील. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीशी संबंधित कामासाठी अनुकूल काळ आहे. एखाद्याची चूक समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करा; घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची चिंता असेल.

तूळ : श्रीगणेश म्‍हणतात, नवीन प्रकल्पासंदर्भात चर्चा होईल. मुलाकडून काही चांगली बातमी मिळाली तर तुम्ही आनंदी व्हाल. व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांशी आणि कर्मचाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. निरुपयोगी कामांमध्ये तुमचा वेळ वाया घालवण्याऐवजी तुमच्या कामांवर लक्ष केंद्रित करा.

वृश्चिक : ग्रहांची स्थिती सकारात्मक आहे. महिलांसाठी वेळ खूप अनुकूल आहे. किरकोळ गोष्टींवरून घरातील वातावरण दुषित होणार नाही, याची काळजी घ्‍या. अनावश्यक वाढत्या खर्चामुळे तणाव वाढेल. व्यावसायिकांशी सुरू असलेल्या स्पर्धेत यश मिळेल.

धनु : श्रीगणेश म्हणतात की, तुमच्या योग्य कार्यशैलीमुळे तुम्हाला समाजात मान्यता मिळेल. इतरांच्या वैयक्तिक बाबींपासून स्वतःला दूर ठेवा. गैरसमजामुळे जवळच्या नातेवाईकाशी वाद होऊ शकतो. मुलांकडे दुर्लक्ष करु नका. व्यवसायात तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार योग्य परिणाम मिळतील. बेकायदेशीर कामात रस घेतल्याने तुमच्यासाठी त्रास होऊ शकतो.

मकर : श्रीगणेश म्हणतात की, तुम्ही बनवलेल्या नियमांमुळे घरात शिस्तबद्ध वातावरण असेल. सकारात्मक वातावरणामुळे परिस्थिती अनुकूल होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे, काहींना कार्यालयात अतिरिक्‍त जबाबदारी संभाळावी लागेल.

कुंभ : श्रीगणेश सांगतात की, काही काळापासून प्रलंबित कामे मार्गी लागतील. घाई करण्याऐवजी शांततेने प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करा.अहंकार आणि अति आत्मविश्वासामुळे नुकसान होऊ शकते. घरातील ज्येष्ठांचा सल्‍ल्‍याचे पालन करा. नवीन व्यवसाय करार फायदेशीर ठरतील.

मीन : आज आर्थिक स्थिती चांगली राहील. प्रियजनांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. कोणत्‍याही वादापासून स्वतःला दूर ठेवा. तुमचा उग्र स्वभाव तुमच्यासाठी त्रासदायक ठरेल. व्यवसायाच्या रखडलेल्या कामात गती येईल.

Previous Post

मोठी अपडेट : स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक एप्रिलमध्ये?

Next Post

Breking : महाकुंभमेळ्यात संगम परिसरात चेंगराचेंगरी !

Next Post
Breking : महाकुंभमेळ्यात संगम परिसरात चेंगराचेंगरी !

Breking : महाकुंभमेळ्यात संगम परिसरात चेंगराचेंगरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group