Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भिंतीवरून उडी मारून बांगलादेशी तरुणी फरार
    क्राईम

    भिंतीवरून उडी मारून बांगलादेशी तरुणी फरार

    editor deskBy editor deskJanuary 28, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    देहविक्री प्रकरणात शासकीय आशादीप महिला वसतिगृहात असलेली १९ वर्षीय बांगलादेशी तरुणी शनिवारी रात्री या वसतिगृहातील स्वच्छतागृहाच्या भिंतीवरून उडी मारून पसार झाली. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, एमआयडीसी परिसरातील हॉटेलमध्ये टाकलेल्या छाप्यात ही बांगलादेशी तरुणी आढळली होती. तिच्याकडे पासपोर्ट, व्हिसा अथवा भारतात वास्तव्याची कोणतीही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे तिच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. २२ डिसेंबरपासून ही तरुणी शासकीय आशादीप महिला वसतिगृहात होती.

    हा प्रकार घडला त्यावेळी आशादीप वसतिगृहातील कनिष्ठ काळजीवाहक मनीषा किरण पाटील, सुरक्षारक्षक वैशाली विजय पाटील, महिला पोलिस परवीन तडवी या नाइट ड्युटीवर होत्या. तीन-तीनजणी असताना बांगलादेशी तरुणीने पलायन केल्याने येथील सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.