Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पाईपलाइन चोरी प्रकरण : सुनील महाजनांचा अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर
    क्राईम

    पाईपलाइन चोरी प्रकरण : सुनील महाजनांचा अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर

    editor deskBy editor deskJanuary 27, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    ब्रिटिशकालीन पाईपलाइन चोरी प्रकरणी महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यावर पाईपलाइन चोरी प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र दाखल गुन्ह्यानंतर ते फरार होते. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) खंडपीठाकडून सुनील महाजन यांना ७ दिवसांसाठी अटकपूर्व जामिनाला मंजुरी दिल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव महापालिका मालकीची जुनी पाईपलाईन जेसीबीच्या सहाय्याने २ डिसेंबर २०२४ रोजी काढली जात होती. या पाईप चोरीचा हा प्रकार उघड झाल्यानंतर याप्रकरणी मनपाचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून संशयित आरोपी अक्षय अग्रवाल, रोहन चौधरी, भावेश पाटील, अमीन राठोड व नरेंद्र पानगडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तपासात सुनील महाजन आणि रोहन चौधरी यांची नावे वाढवली होती. या प्रकरणात सूत्रधार सुनील महाजन हे असल्याचे समोर आले होते. यानंतर आणखी २ वेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

    गुन्ह्यात सर्व प्रकरणाचा सूत्रधार म्हणून आरोप असलेले महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते सुनील महाजन हे अजूनही फरार आहे. त्यांच्या शोधासाठी पोलीस उपअधिक्षक संदीप गावित यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. सुनील महाजन मिळून येत नसल्याने त्यांची मालमत्ता जप्तीची कारवाई प्रशासनाने सुरू केली होती. तर महाजन यांनी मुंबई उच्चन्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठात याचिका दाखल केली होती.  खंडपीठाच्या न्या.पेडणेकर यांच्या न्यायालयाने सुनील सुपडू महाजन यांना ७ दिवसांसाठी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पुढील कामकाज दि.४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. महाजन यांच्यातर्फे अँड.सागर चित्रे आणि अँड.राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.