Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धुळ्यात खळबळ : स्मशानात अघोरी कृत्य, अर्धवट जळालेला बोकड, तरुणींचे फोटो अन् लिंबू, सुया !
    क्राईम

    धुळ्यात खळबळ : स्मशानात अघोरी कृत्य, अर्धवट जळालेला बोकड, तरुणींचे फोटो अन् लिंबू, सुया !

    editor deskBy editor deskJanuary 27, 2025No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धुळे : वृत्तसंस्था

    विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी आणि अनेक गोष्टींची उकल केली असली तरी लोकांचा तंत्र-मंत्र, काळी नजर, काळी जादू आणि अघोरी कर्मकांड यावरील विश्वास काडीमात्र कमी झालेला नाही. असाच अघोरी पुजेचा खेळ धुळे जिल्ह्यातील मोहाडी (प्र. डांगरी) येथील स्मशानात मध्यरात्री सुरू होता. या अघोरी कृत्य करणाऱ्या बाबाचे सारे सुरळीत चालले असताना एका शेतकऱ्याने त्याला हटकल्याने त्याने स्मशानातून पळ काढला. ‘त्या’ शेतकऱ्याने अघोरी कृत्य करणाऱ्या बाबाची पूजा जवळून पाहिली. तेव्हा त्याच्या पायाखालची वाळूच घसरली. त्यास चांगलाच धाम फुटला, त्याचे पाय लटपटू लागले होते. अघोरी कृत्य करणाऱ्या बाबाने एका बोकडाची मान धडावेगळी केलेली होती.

    दोन जीवंत कोंबड्यांचे पाय दोरीने बांधलेले होते. सरण जेथे रचतात त्या ओट्यावर २०० ते २५० लिंबू, कवड्यांचा खच पडलेला होता. या लिंबूवर हळद, कुंकू, काळा बुक्का, अत्तर शिंपडण्यात आले होते. बोकडाची मान अधर्वट जळालेल्या स्थितीत होती. तर लिंबूंवर सुया टोचून त्यात तरूणींचे फोटो लावण्यात आले होते. स्मशानभूमीत जाऊन या ठिकाणची पाहणी ग्रामस्थ, पोलीस पाटील, सरपंच यांच्यासह महा. अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील, रणजित शिंदे, प्रा. डॉ. दीपक बाविस्कर, नंदकिशोर सूर्यवंशी यांनी केली.

    स्मशानभूमीतील भयाण शांतता अंगाचा थरकाप उडवते. रात्री तेथे भूतांचा संचार असतो, असा गैरसमज जनमाणसात असल्याने रात्रीला स्मशानात कोणीही पाय ठेवत नाही. मात्र, अमावस्या अन् पौर्णिमेला अघोरी कृत्य करणाऱ्या बाबांची पाऊले स्मशानभूमीच्या दिशेने आपोआप वळतात. विद्या हासील करण्यासाठी अथवा घेतलेली सुपारी पूर्ण करण्यासाठी हे मांत्रिक स्मशानातच ‘अघोरी’ पूजा मांडतात. मोहाडी (प्र. डांगरी) येथील स्मशानभूमीत साधारणतः मध्यरात्री २.२० वाजता बाबा आणि त्याच्यासोबत काही जण चारचाकी वाहनातून स्मशानात आले. त्यांनी सोबत एक बोकड, दोन जीवंत कोंबडे आणि पुजेचे साहित्य आणले होते. मुक्या प्राण्यांचा बळी देण्याच्या ते इराद्याने आले होते. यापैकी बोकड्याची मान एकाच झटक्यात धडावेगळी करण्यात आली होती. यासाठी बहुधा तलवारीचा वापर झाला असेल. इतक्या सराईतपणे ती मान छाटण्यात आली होती, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

    बोकडानंतर कोंबड्यांचा बळी जाणे निश्चित होते. बाबाने पुजेसाठी अग्नीडाग देण्यासाठी वापरण्यात येणारा ओटा निवडला होता. या ओट्यावरच लिंबूंचा खच, तरूणींचे फोटो, बोकडाची मान आणि इतर पूजासाहित्य मांडण्यात आले होते. तसेच अवतीभोवती रांगोळी काढण्यात आली होती. संबंधित अघोरी बाबाची पूजा ऐन भरात आलेली असताना नजिक शेत असलेल्या शेतकऱ्याला जाग आली. त्याला स्मशानात सरण जळताना दिसले. तेथे काही लोकांच्या हालचाली संशयास्पदपणे दिसल्याने त्याने तिकडे टॉर्च चमकावली. आपल्याला कोणीतरी बघतयं ही चाहूल लागताच अघोरी बाबा आणि त्याच्या सोबतचे सहकारी दचकले. आपण लोकांच्या तावडीत सापडलो तर मार बसेल हे ओळखून त्यांनी स्मशानातून धूम ठोकली.

    दरम्यान, या घटनेची वार्ता गावात पसरताच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सकाळी तिकडे धाव घेतली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अघोरी बाबाला कोणाचा तरी जीव घ्यायचा असेल किंवा त्यांना मुलींना वश करून द्यायचे असेल अशी चर्चा तेथे रंगली होती. तसेच स्मशानात आढळलेले फोटो हे बिहारी असल्याची कुजबूजही ग्रामस्थांमध्ये आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली : 35 जखमी, 5 गंभीर !

    December 2, 2025

    वाळूमाफियांची दादागिरी वाढली : थेट तलाठ्याला केली जबर मारहाण !

    December 2, 2025

    एकाच झाडावर प्रेमीयुगुलाने संपविले आयुष्य !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.