• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दुचाकी व चारचाकीचा भीषण अपघात : पाच महिन्याच्या चिमुकल्यासह दोन जागीच ठार

editor desk by editor desk
January 27, 2025
in क्राईम, राज्य
0
दुचाकी व चारचाकीचा भीषण अपघात : पाच महिन्याच्या चिमुकल्यासह दोन जागीच ठार

चंद्रपूर : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडत असतांना गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्याच्या नवेगावबांध – बाराभाटी मार्गावर भीषण अपघात घडला आहे. चार चाकी वाहनानी दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकी वरील तीन जण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये एका महिलेसह पाच महिन्याच्या बाळाचा देखील समावेश आहे. तर या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी असून त्याला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एरंडी देवळगाव येथील रहिवासी असलेले संदीप राजू पंढरे हे आपली पत्नी चितेश्वरी पंढरे यांच्यासोबत दुचाकीवरून नवेगावबांध येथे जात होते. त्यांच्यासोबत त्यांचा पाच महिन्यांचा मुलगा संचित पंढरे, पत्नी चितेश्वरी पंधरे आणि घराशेजारी राहणारी तीन वर्षांची मुलगी पार्थवी सिडाम देखील होती. मात्र, त्यांच्या दुचाकीला भरधाव बोलेरो पिकप वाहनाने मागून जोरदार धडक दिली. यामध्ये चितेश्वरी पंढरे, त्यांचा पाच महिन्याचा मुलगा संचित पंढरे आणि घराशेजारील पार्थवी सिडाम हे तिघेही जागीच ठार झाले. तर दुचाकी चालक असलेले संदीप पंढरे हे गंभीर जखमी झाले आहेत.

सदरील अपघाताची माहिती मिळताच नवेगावबांध येथील पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी व्यक्तीला नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र अधिक उपचारासाठी त्यांना ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर मृतकांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले.

या प्रकरणात स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. मात्र चार चाकीचा वेग अधिक असल्याने हा भीषण अपघात घडला असल्याचा देखील सांगण्यात येत आहे. यामध्ये दुचाकी वरील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.

Previous Post

या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !

Next Post

उत्तर महाराष्ट्रासह काही भागात पुढील दोन दिवस वाढणार तापमान !

Next Post
उत्तर महाराष्ट्रासह काही भागात पुढील दोन दिवस वाढणार तापमान !

उत्तर महाराष्ट्रासह काही भागात पुढील दोन दिवस वाढणार तापमान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !
Uncategorized

खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !

June 15, 2025
भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !
Uncategorized

भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !

June 15, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

बालकाला शिवीगाळ करीत तिघांना बेदम मारहाण

June 15, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दाणाबाजारात तरुणाला जबर मारहाण !

June 15, 2025
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी
अमळनेर

२८ वर्षीय तरुणाला विजेचा शॉक लागून मृत्यू !

June 15, 2025
खान्देशात वीज पडून तीन जण ठार !
क्राईम

खान्देशात वीज पडून तीन जण ठार !

June 15, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group