• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ड्रायफूट दुकानादाराची ४३ हजाराची फसवणूक; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 3, 2022
in क्राईम, जळगाव
0
ड्रायफूट दुकानादाराची ४३ हजाराची फसवणूक; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । विशेष लेखा परिक्षक असल्याचे भासवून काजू, बदाम आणि गावरानी तूप प्रत्येकी विस किलो प्रमाणे ड्रायफूटचा एकुण ४३ हजाराचा मुद्देमाल घेवून दुकानदाराची केली आहे. आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जिल्हापेठ परिसरातील रसाळ चेंबर्स लेवा बोर्डिंग समोर अजय रतनसी सोनी (वय-५८) हे वास्तव्यास आहे. याच ठिकाणी त्यांचे सोनी ड्रायफूट व जनरल स्टोअर्स नावाचे त्यांचे दुकान आहे. ६ मार्च २०१८ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सोनी व त्यांचा भाऊ संजस रतनसी हे दोघे दुकानात असतांना कैलास फकिरा बिरारे, रा. पोखरण रोड, ठाणे या नावाचा व्यक्ती आला. शासनाचा विशेष लेखापरीक्षक असल्याचे सांगून जलाराम मंडळास काही वस्तू भेट द्यायचे असल्याचे त्याने सांगितले. अशा पध्दतीने बोलता बोलता त्याने सोनी भावंडांचा विश्वास संपादन केला तसेच विशेष लेखापरीक्षक असल्याचे ओळखपत्रही दाखवले. ओळखपत्र पाहून सोने भावंडांचाही त्याच्यावर विश्वास बसला.

विश्वास संपादन केल्यावर कैलास बिरारे याने सोनी दुकानातून २० किलो काजू, २० किलो बदाम व २० किलो गावरानी तुप खरेदी अशा पध्दतीने ४३ हजारांचा सामान खरेदी केलेा. त्याचे पक्के बिल घेतले. मात्र पैसे रोखीने न देता टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड या बँकेचा धनादेश दिला. सोनी यांनी हा धनादेश बँकेत टाकला असता तो वटला नाही. त्यानंतर सोनी यांनी बिरारे यांना मोबाईलवर वेळोवेळी संपर्क साधला मात्र पैसे मिळाले नाही. त्यानंतर सोनी यांनी ठाणे शहर गाठले. याठिकाणी बिरारे यांच्या बहिणीची भेट घेतली. मात्र बहिणीने त्याच्यासोबत माझा कुठलाच संपर्क नाही. उलट त्याने माझेच पैसे बुडवले असल्याचं सांगितलं. त्यानंतर सोनियांनी वेळोवेळी बिरारे या संपर्क साधला काही काळानंतर बिरारे याने फोन उचलणे बंद केले. यानंतर दुकानदार सोनी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात कैलास फकिरा बिरारे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र बागुल हे करीत आहेत.

Previous Post

रामेश्वर कॉलनीतील तरूणाची राहत्या घरात घेतला गळफास

Next Post

“शावैम” मध्ये आतड्याच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया यशस्वी

Next Post
“शावैम” मध्ये आतड्याच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया यशस्वी

"शावैम" मध्ये आतड्याच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया यशस्वी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

कुटुंबातील सदस्यांमध्ये कुणीतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, सावधगिरी बाळगा.

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group