जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील कानळदा येथे हौदामधील पाण्यात झोपून प्रियंका रवींद्र भंगाळे (३१, रा. कानळदा, ता. जळगाव) तरुणीने या आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (२५ जानेवारी) सकाळी आठ वाजेच्या सुमारास कानळदा येथे घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका भंगाळे या तरुणीचे अभियांत्रिकीचे शिक्षण झाले असून ती मध्यंतरी पुणे येथे नोकरीलादेखील होती. पोलिस पाटील नारायण पाटील यांनी पोलिसात खबर दिली. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.