Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दूध फेडरेशन रस्त्यावर १२ तासात दुसरा बळी : दुचाकीस्वारांची मस्ती !
    Uncategorized

    दूध फेडरेशन रस्त्यावर १२ तासात दुसरा बळी : दुचाकीस्वारांची मस्ती !

    editor deskBy editor deskJanuary 26, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील दुध फेडरेशन रोडवर सकाळी १० वाजेच्या सुमारास भीषण अपघातात एक तरुण ठार झाल्याची घटना घडल्यानंतर त्याच रस्त्यावर रात्री ९ वाजता पुन्हा भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्यामुळे सिकंदर दिलावर पठाण (५६, रा. राजीव गांधी नगर) हे ठार झाले. हा अपघात शनिवारी (२५ जानेवारी) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दूध फेडरेशन रस्त्यावर झाला.

    मिळालेल्या माहितीनुसार, सुरत रेल्वे गेटकडून शिवाजीनगर उड्डाणपूलाकडे दोन दुचाकीस्वार “रेस” लावून जात होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. या रेसमुळे हा अपघात झाला. सिकंदर पठाण हे पायी जात असताना त्यांना धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार काही अंतरावर उभ्या असलेल्या रिक्षाला धडकला. सुदैवाने त्या ठिकाणी प्रवासी महिला बचावली. शनिवारी सकाळी डंपरणे ट्रॅक्टरला धडक दिल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या १२ तासात हा दुसरा अपघात होऊन आणखी एकाचा बळी गेला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पाळधीत मोठी दुर्घटना! स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी, २ गंभीर

    March 16, 2026

    बचत खात्यात शिल्लक कमी? दंडाबाबत मोठी माहिती समोर

    March 11, 2026

    प्रशासकीय राजवटीतील निर्णयांवर श्वेतपत्रिका जाहीर करा नगरसेविका वैशाली अमित पाटील

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.