Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नाशिक डेपोच्या बसला भीषण आग : सुदैवाने ४० प्रवासी बचावले !
    क्राईम

    नाशिक डेपोच्या बसला भीषण आग : सुदैवाने ४० प्रवासी बचावले !

    editor deskBy editor deskJanuary 25, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत असतांना दि.२४ रोजी शुक्रवारी नाशिकहून सोलापूरकडे जात असलेल्या एसटी बसला नगर-सोलापूर महामार्गावर मिरजगाव येथे दुपारी आग लागली. त्यात संपूर्ण बस खाक झाली. चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील 40 प्रवासी सुखरूप बचावले.

    मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक आगाराची एसटी बस (एमएच 14 बीटी 4952) सकाळी सहा वाजता नाशिकहून सोलापूरला जाण्यासाठी निघाली होती. ही बस नगरहून दुपारी बाराच्या दरम्यान पुढे निघाली. दुपारी एकच्या सुमारास ती मिरजगाव बसस्थानकापासून पाचशे मीटरवर दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ आली, तेव्हा बसच्या इंजिनजवळ काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याचे चालक संतोष टोपनदारे यांच्या लक्षात आले. इंजिनकडील बाजूने धूर निघत असल्याचेही त्यांना दिसले. त्यांनी तातडीने बस थांबविली. तपासणी करताना बॅटरीमधून धूर निघत असल्याचे दिसले. त्याच वेळी इंजिनच्या बाजूने बसने अचानक पेट घेतला. त्या वेळी चालक टोपनदारे आणि वाहक सांगवे यांनी सतर्कता दाखवीत सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरण्यास सांगितले. तोपर्यंत जवळच असलेले मिरजगावचे ग्रामस्थ जमा झाले. सर्वांनी प्रवाशांना बसमधून खाली उतरविले.

    त्यानंतर काही वेळातच संपूर्ण एसटी बसने पेट घेतला. मिरजगाव ग्रामस्थांनी आजूबाजूने पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात यश आले नाही. कर्जत नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबही मागविण्यात आला. माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील घटनास्थळी आले. त्यांच्या पथकाने नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली. कर्जत येथील अग्निशामक बंब आल्यानंतर बसची आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत संपूर्ण बस खाक झाली होती. त्या वेळी रस्त्यावर आणि परिसरात मोठी गर्दी झाली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.