Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात भरधाव डंपरच्या धडके ट्रॅक्टर पलटी : तरुण ठार !
    क्राईम

    जळगावात भरधाव डंपरच्या धडके ट्रॅक्टर पलटी : तरुण ठार !

    editor deskBy editor deskJanuary 25, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील शिवाजी नगर उड्डाणपूल ते दूध फेडरेशन रस्त्यावर पेट्रोल पंपासमोर विटा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाला तर दोन जण जखमी झाल्याची घटना आज दि.२५ जानेवारी शनिवारी रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. यावेळी घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेतली असून डंपर ताब्यात घेतला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दूध फेडरेशनजीक असलेल्या भाग्यश्री पेट्रोल पंपासमोर ट्रॅक्टर क्रमांक एमएच १९ एएन २९०६ विटा घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टरचा भीषण अपघात होवून ट्रॅक्टर पलटी झाले. या घटनेत अंकुश आत्माराम भिल वय-२७, रा. डिकसाई ताम जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. ट्रॅक्टरवर असलेले सुनील मधुकर भिल वय-२२, गणेश भगीरथ भिल वय-१८, आणि शुभम सुखा भिल वय -२० तिघे राहणार इदगाव ता. जळगाव हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले होते. या घटनेची माहिती मिळतात जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच डंपर हा ताब्यात घेतला आहे. या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.