जळगाव : प्रतिनिधी
राहत्या घरामध्ये गळफास घेऊन सतीश अशोक संन्यासी (३५, रा. रामेश्वर कॉलनी) यांनी आत्महत्या केली. ही घटना २३ जानेवारी रोजी रामेश्वर कॉलनीत घडली.
मिळालेल्या माहितीनुसार रामेश्वर कॉलनीमध्ये हातमजुरी करणारे सतीश संन्यासी हे कुटुंबासह राहतात. २३ जानेवारी रोजी त्यांनी घरात गळफास घेतला. काही वेळानंतर हा प्रकार त्यांच्या भावाच्या लक्षात आला. त्यावेळी संन्यासी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.