जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहराचे विकासाचे व्हिजन असलेले आणि सर्वसामान्य जनतेसह सर्वपक्षीय मोट बांधणारे, सर्वांना आपलेसे असलेले नेतृत्व म्हणजेच प्रदीप भाऊ रायसोनी यांच्याकडे पाहिले जाते. प्रदीप भाई रायसोनी यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय व्हावे यासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर ज्यांना आपण राजकीय विद्यापीठाचे कुलगुरू म्हणतो असे अमित एकनाथ पाटील यांनी देखील यासाठी पुढाकार घेतल्याचे सूत्रांकडून समजते.
एका सोशल मीडियाच्या ग्रुप वर राजकीय विद्यापीठाचे कुलगुरू अमित पाटील यांनी देखील परखड मत मांडले आहे. जळगाव शहराला प्रदीप रायसोनी यांच्या सारखे विकासाचे व्हिजन असलेले नेतृत्व हवे. भाजपाला कधी एवढे यश मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली मिळाले होते परंतु गिरीश महाजन यांचा राज्यातील राजकारणातील सक्रिय सहभाग पाहता त्यांना महापालिकेकडे लक्ष देण्याची वेळ न होती. अखेर भाजपाचे नगरसेवक देखील मागील काळात फुटलेले पहिले आपण ही मोट बांधण्यासाठी प्रदीप रायसोनीसारख्या व्यक्तिमत्त्वाची गरज आहे राजकारणात सक्रिय प्रदीप भाई रायसोनी यांनी व्हावे अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. शहराची पुन्हा विस्कटलेली घडी रूडावर आणण्यासाठी प्रदीप रायसोनी यांनी पुढे यावे असे उद्योजकांचे देखील म्हणणे आहे.
त्यांच्या सक्रिय राजकारणाच्या जीवनातील काही अपवाद घटना उघडता त्यांचे जळगाव शहरातील योगदान हे न विसरण्यासारखे आहे हे देखील स्पष्ट करावे लागेल. जळगाव शहर हे नवा रुपाला आलेले शहर आहे मधल्या काळात कुठेतरी नजर लागल्यासारखे प्रकार या शहरात घडले आता पुन्हा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली उभारी घेतलेली आहे यासाठी जोड जोड निर्माण करायची असेल तर प्रदीप रायसोनी यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे आगामी काळातील राजकारण लवकरच बदलणार असून प्रदीप रायसोनी यांनी सत्तेच्या प्रवाहात यावे आणि शहराचा विकास पुन्हा करून दाखवावा अशी अपेक्षा जनतेचे आहे.