• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

‘छावा’ सिनेमाच्या ट्रेलरवरून उठले वादंग : मराठा क्रांती मोर्चा आक्रमक !

editor desk by editor desk
January 24, 2025
in क्राईम, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
‘छावा’ सिनेमाच्या ट्रेलरवरून उठले वादंग : मराठा क्रांती मोर्चा आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था

येत्या काही दिवसांनी छावा हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मात्र त्यापूर्वीच या चित्रपटांमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांना एकत्र नृत्य करताना दाखवले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शन झाला आहे. आता या ट्रेलरवरून वादंग उठण्याची शक्यता वर्तवली जात आहे. छावा संघटना तसेच मराठा क्रांती मोर्चाने या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे, तर माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी देखील यावर नाराजी व्यक्त करत आपली भूमिका मांडली आहे. या चित्रपटात अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला छावा हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र,

छावा चित्रपटाबाबत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, छावा या नावाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट येत आहे, ही आनंदाची बातमी आहे. हा चित्रपट तयार करणे हेच खूप मोठे धाडस आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास यातून जगासमोर येईल. मात्र चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे मला येऊन भेटले होते. त्यांनी ट्रेलरची क्लिप मला दाखवली आहे. पण मी पूर्ण चित्रपट दाखवण्याची मागणी केली होती. माझ्यासोबत काही इतिहासकार यांना देखील पूर्ण चित्रपट दाखवण्याची मागणी माझी होती. त्यानंतर या चित्रपटात काही चूक असेल तर ते दुरुस्त करता येईल, असे माझे मत होते. मात्र इतिहासकारांना भेटण्यास त्यांनी स्वारस्य दाखवले नसल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

या संदर्भात संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, दिग्दर्शक उतेकर यांनी शंभर ते दोनशे कोटी रुपये खर्च करून संभाजी महाराजांवरील हिंदी चित्रपट तयार केला आहे. या माध्यमातून महाराजांचा इतिहास आज जगभरात जाणार आहे. मात्र, ट्रेलर मध्ये महाराजांना नृत्य करताना दाखवल्यामुळे लोकांना ते कितपत पटेल याबाबत माझ्या मनात शंका असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आम्ही आणि राज्यातील इतिहासकार बसून यावर चर्चा करून मार्ग काढू, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

‘छावा’ या चित्रपटातील ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे नृत्य करतानाचे दृष्य दाखवण्यात आले आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने या चित्रपटास विरोध दर्शवला आहे. तसेच या चित्रपटाला छावा संघटना, तृप्ती देसाई आणि संभाजीराजे यांनीही विरोध दर्शवल्यामुळे चित्रपट प्रदर्शीत होतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

सर्वसामान्यांना धक्का : लालपरीचे दर आजपासून वाढले !

Next Post

जळगाव शहरासाठी पुन्हा चाणक्य प्रदीप रायसोनी यांनी महापालिकेच्या राजकारणात सक्रिय व्हावे

Next Post
जळगाव शहरासाठी पुन्हा चाणक्य प्रदीप रायसोनी यांनी महापालिकेच्या राजकारणात सक्रिय व्हावे

जळगाव शहरासाठी पुन्हा चाणक्य प्रदीप रायसोनी यांनी महापालिकेच्या राजकारणात सक्रिय व्हावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group