मुंबई : वृत्तसंस्था
देशभरात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नुकतेच राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लालपरीच्या तिकिटात वाढ करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने हा निर्णय घेतल्यामुळे तिकीट दरात 14.97 टक्के वाढ होणार आहे. ही दरवाढ आजपासून (24 जानेवारी) लागू होईल. तसेच एसटीसोबत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीलाही मान्यता दिली आहे. त्यामुळे दोन्ही वाहनांच्या दरात 3 रूपयांची वाढ होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. लालपरीचे भविष्य अंधांतरी होते. हे वाटत असताना दररोज तीन कोटी रूपयांचे नुकसान होत होते. ते दरवाढीमुळे कुठेतरी कमी होईल. प्राधिकरणाची बैठक मंत्रालयात पार पडली. त्यात लोकप्रतिनिधींचा समावेश नसतो.
गृह, परिवहन आणि अर्थ खात्याचे प्रधान सचिव बैठक आयोजित करतात. या बैठकीत एसटीची भाडेवाढ 14.97 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय झाला. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ 1 फेब्रुवारीपासून होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाड 3 रूपायांनी झाली आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
डिझेल, सीएनजीचे दर वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येक वर्षी भाडेवाढ अपेक्षित असते. तीन चार वर्षांपासून भाडेवाढ झाली नसल्यानं एकत्रितपणे 14.97 टक्के भाडेवाढ आजपासून लागू होईल. भाडेवाढीमुळे सर्वसामान्य लोकांचे बजेट कोलमडणार आहे, हे मान्य आहे. पण, एसटी महामंडळाची स्थिती चांगली नाही. एसटीच्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. एसटीचे दिवसाला तीन कोटी रूपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे भाडेवाढ अपरिहार्य आहे. प्रवाशांना चांगली सेवा द्यायची असेल, तर या गोष्टीची भविष्यात गरज पडणार आहे. डिझेलचे दर वाढत आहेत. मेंटनन्सचा खर्च अधिक येतो. लाडक्या बहिणींना तिकीट दरात 50 टक्क्यांची सवलत दिली आहे. त्यामुळे एसटीचं उत्पन्न वाढलं आहे. 75 वर्षांवरील वृद्धांना शासनानं मदत करणे आवश्यक आहे. असे देखील सरनाईक म्हणाले.