भंडारा : वृत्तसंस्था
राज्यातील भंडारा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. याठिकाणी असलेल्या आयुध निर्माण कंपनीत स्फोट होऊन त्यात 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना जवाहरनगर येथून समोर आली आहे. यातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी 11 वाजता हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. भीषण स्फोटामुळे हा परिसर हादरला. दूरपर्यंत स्फोटाचे हादरे बसले. आयुध निर्माण कारखान्यातील या स्फोटाने नागरीक भेदरून गेले. या स्फोटाचे कारण काय आहे हे समोर आलेले नाही.
या स्फोटाची भीषणता इतकी तीव्र होती की, त्याचा आवाज जवळपास ३-४ किलोमीटरपर्यंत गेला. नागरीक भयभीत होऊन रस्त्यावर थांबले, तर काही जण घराबाहेर धावले. भंडारा शहराजवळील जवाहरनगर परिसरात सरकारचा आयुध निर्माण कारखाना आहे. या भीषण स्फोटाने आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर स्फोटाची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
या स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवाहरनगरातील आयुध निर्माण कारखान्यातील सी सेक्सनमध्ये भीषण स्फोट झाला. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या कंपनीत दारू गोळा तयार करण्यात येतो.
या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत पोहचला. अनेकांनी कारखान्याकडे धाव घेतले. 3 ते 4 किलोमीटर पर्यंत आवाज गेला. या स्फोटानंतर भीषण आग लागली. धुराचे लोट दूरवरून दिसत होते. अनेक वाहनधारकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये त्याच चित्रीकरण केले. साधारणपणे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. जवाहरनगर येथील आयुध निर्माण कारखान्यातील सी सेक्शन २३ क्रमांकाच्या इमारतीत हा भीषण स्फोट झाला. त्यात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले आहे.