जळगाव : प्रतिनिधी
शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात झालेल्या खुनाच्या घटनेतील संशयित राहुल ऊर्फ प्रेम शांताराम सोनवणे (वय २१) व शैलेश ऊर्फ पंकज शांताराम सोनवणे (वय २६, दोन्ही रा. बौध्द वसाहत पिंप्राळा हुडको) हे दोघे कानळदा रस्त्यावरील शेतात लपून बसले होते. रामानंद नगर पोलिसांनी तपासचक्रे फिरवित संशयितांच्या मुसक्या आवळल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुकेश रमेश शिरसाठ या तरुणावर कोयत्याने वार करुन त्याची निर्घण हत्या केली होती. त्यातील दोघे फरार होते. पो.नि. राजेंद्र गुंजाळ यांनी गुप्त माहिती मिळाल्यावरुन सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहायक फौजदार संजय सपकाळे, हवालदार इरफान मलिक, हेमंत कळसकर, रेवानंद साळुखे, रवींद्र चौधरी, उमेश पवार व जुलालसिंग परदेशी यांच्या पथकाने शेतात लपून बसलेल्या संशयितांच्या मुसक्या आवळल्या