• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात कृउबात कामगाराची गळफास घेवून आत्महत्या

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 2, 2022
in क्राईम, जळगाव
0
जळगावात कृउबात कामगाराची गळफास घेवून आत्महत्या

एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव प्रतिनिधी । कांचन नगरातील ४८ वर्षीय प्रौढाने कृषी उत्पन्न बाजार समितीत कामाच्या ठिकाणी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रमेश सुकलाल राजपूत (वय ४८) रा. काचन नगर जळगाव असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, रमेश राजपूत हे बुधवारी २ मार्च रोजी सकाळी नेहमीप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेले होते. अन्य कर्मचाऱ्यांसोबत शिलाईसाठी बारदान त्यांनी काढले. यावेळी “मला जरा बरे नाही वाटत, मी आत जाऊन झोपतो” असे म्हणून रमेश राजपूत हे दुकानाच्या आत मध्ये गेले. बाकी कर्मचारी हे बाहेर बसून बारदान शिलाई करीत होते. काही वेळाने कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले की, रमेश राजपूत हे बऱ्याच वेळपासून बाहेर आले नाही. सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांनी आत जाऊन बघितले असता, रमेश राजपूत हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. तातडीने कर्मचाऱ्यांनी त्यांना खाली उतरविले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. यावेळी नातेवाइकांनी एकच आक्रोश फोडला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान दिड महिन्याच्या काळातच मुलाच्या पाठोपाठ पित्यानेही जीवन संपविल्याने घरातील कर्ता पुरुष निघून गेला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous Post

ओंकारेश्वर मंदीर परिसरात महाशिवरात्री निमित्त बारा ज्योर्तिलिंगम् दर्शन, शिव प्रतिज्ञा, शिव तांडव नृत्यांनी भाविकांचे प्रबोधन

Next Post

तरूणीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या तरूणावर गुन्हा दाखल

Next Post
तरूणीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या तरूणावर गुन्हा दाखल

तरूणीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या तरूणावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group