पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीवर गेल्या काही दिवसपासून महाविकास आघाडीचे नेते टीकास्त्र करीत असतांना व सध्या महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून सुरु असलेल्या वादावर नेते प्रतिक्रया देत असतांना आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून राज्यातील राजकारणात चर्चेला सुरुवात झाली आहे.
अजित पवार म्हणाले कि, बाबासाहेब पाटील यांना पवार साहेबांशी काही बोलायचे होते, त्यामुळे ते साहेबांजवळ जाऊन बसले. माझा आवाज मोठा आहे. त्यामुळे मी कोठूनही बोललो, तरी आवाज साहेबांपर्यंत जातो, असा खुलासा त्यांनी केला आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. यावेळी अजित पवार आणि शरद पवार यांच्या खुर्चीची व्यवस्था बदलण्यात आली होती. यावर पवार यांनी खुलासा केला. याच कार्यक्रमात शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अजित पवार यांच्यासोबत बसले होते. यावेळी दोघांमध्ये दिलखुलास गप्पा सुरू होत्या. याची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती.
ते पुढे म्हणाले की, शरद पवारांशी साखर व्यवसायाबाबत चर्चा केली. येत्या काळात जगभर साखरेची मागणी वाढेल, असे जाणकारांचे मत आहे. एप्रिल, मे, जून महिन्यात साखरेला दर चांगले मिळतील. त्यामुळे साखर विक्रीची घाई कुणी करू नये, असे स्पष्ट करत साखरेची एफआरपी वाढत गेली आहे. परंतु त्या प्रमाणात एमएसपी जशी आहे तशीच आहे. साखरेचे दर आणखी वाढतील, असे पवार म्हणाले.