जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात पुष्पक एक्सप्रेसच्या एका कोचला आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी रेल्वे रूळावर उड्या घेतल्या मात्र त्याचवेळी समोरून येणार्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेक प्रवाशांना चिरडले. ही घटना पाचोराजवळील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत नेमक्या किती प्रवाशांचा मृत्यू झाला वा जखमी झाले याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही मात्र या घटनेने रेल्वे प्रशासनासह जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून स्थानिक पोलीस प्रशासनासह जिल्हाधिकारी तसेच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुष्पक एक्सप्रेसच्या एका कोचमधून धूर येत असल्याने कोच आग लागल्याचे वाटून काही प्रवाशांनी उड्या मारल्या मात्र त्याचवेळी समोरून येणार्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेक प्रवाशांना चिरडले तर अनेक जण या अपघातात जखमी झाले. या भीषण अपघाताने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या अपघातानंतर परधाडे येथे मोठी गर्दी वाढली असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


