• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

“जीवनात यश आणि अपयश पचविण्याची क्षमता खेळा मुळेच येते.” – जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे

राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेस आज उत्साहात सुरवात

editor desk by editor desk
January 22, 2025
in क्रिंडा, जामनेर, राज्य
0
“जीवनात यश आणि अपयश पचविण्याची क्षमता खेळा मुळेच येते.” – जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे

जळगाव : प्रतिनिधी

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेस जिल्हा क्रीडा संकुल येथे आज उत्साहात सुरवात झाली.

या स्पर्धेचे उदघाटन जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी क्रीडाज्योत प्रज्वलित करून केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार्थी प्राचार्य डॉ.हनुमंत लुंगे, भाऊसाहेब राऊत विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.एस.तायडे, भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ. प्रदीप तळवलकर, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे तांत्रिक समितीचे अध्यक्ष कैलास करवंदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कारर्थी किशोर चौधरी, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव, तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, नाशिक विभागीय क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रशांत कोल्हे, महाराष्ट्र सेपक टकारो असोसिएशनचे सहसचिव प्रा.इकबाल मिर्झा, जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे यांची उपस्थिती होती.

राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले तर राजेश जाधव, एल.एस.तायडे, प्राचार्य डॉ हनुमंत लुंगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी डॉ.सुरेश थुरकुडे यांनी केले. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय डॉजबॉल खेळाडू उमाकांत जाधव (जळगाव) विराज कावडिया (जळगाव) संतोष कोळी (पुणे) नरेश राऊत (ठाणे) तसेच राष्ट्रीय प्रशिक्षक नौशाद शेख (सातारा) शरद बढे (धाराशिव) यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. स्पर्धेत नाशिक, पुणे, मुंबई, कोल्हापूर, लातूर, छ्त्रपती संभाजीनगर व अमरावती विभागाचे मुले मुली संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी व जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.

Previous Post

कुठल्याही धोरणात्मक मुद्यांवर बोलू नका ; अजित पवारांनी दिली मंत्र्यांना तंबी !

Next Post

ब्रेकिंग : रेल्वेच्या कोचला आग लागल्याची भीती : प्रवाशांनी मारल्या रेल्वेतून उड्या !

Next Post

ब्रेकिंग : रेल्वेच्या कोचला आग लागल्याची भीती : प्रवाशांनी मारल्या रेल्वेतून उड्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून होवू शकतो आपल्या खिश्यावर परिणाम ; वाचा सविस्तर !
राजकारण

उद्यापासून होवू शकतो आपल्या खिश्यावर परिणाम ; वाचा सविस्तर !

May 31, 2025
मोठी बातमी : देशात खाद्यतेलांचे दर होणार कमी !
आरोग्य

मोठी बातमी : देशात खाद्यतेलांचे दर होणार कमी !

May 31, 2025
चित्रपट दिग्दर्शकाची केली होती हगवणे परिवाराने फसवणूक !
क्राईम

चित्रपट दिग्दर्शकाची केली होती हगवणे परिवाराने फसवणूक !

May 31, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

अकरावी प्रवेशासाठी घेतली दोन शिक्षकांनी लाच !

May 31, 2025
धुळ्यात खळबळ : विवाहितेचा इंजेक्शन देवुन खून ; जवान पती, प्रियसीसह पाच जणांना अटक !
क्राईम

धुळ्यात खळबळ : विवाहितेचा इंजेक्शन देवुन खून ; जवान पती, प्रियसीसह पाच जणांना अटक !

May 31, 2025
फसवणूक केल्याप्रकरणी मॅनेजरचा अटकपूर्व जामीन फेटाळला !
क्राईम

फसवणूक केल्याप्रकरणी मॅनेजरचा अटकपूर्व जामीन फेटाळला !

May 31, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group