मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील बीड जिल्ह्यातील खून प्रकरण जोरदार चर्चेत आले असतांना आता बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मीक कराड याची सीआयडी कोठडी आज संपली. त्यामुळे त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. आता त्याला पुन्हा सीआयडी कोठडी मिळते की, न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली जाते? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सीआयडीला गरज भासल्यास पुन्हा कोठडी मागू शकते.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी अटक असलेल्या आरोपींचा मुख्य सूत्रधार हा वाल्मीक कराडच असल्याचा दावा केला जात आहे. यासंदर्भात वाल्मीक कराड याच्यावर देखील मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचे आणि आरोपींचे असलेले संबंध आणि या प्रकरणातील त्याचा हात, याचा तपास करण्यासाठी सीआयडी पथकाने वाल्मीक कराडच्या सीआयडी कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने त्याला सात दिवसांची कोठडी सुनावली होती. त्यानुसार आज त्याची कोठडी पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका लावण्यात आल्यानंतर 15 जानेवारी रोजी वाल्मीक कराड याला बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आल्यानंतर न्यायालयाने तपासासाठी त्याला सात दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली होती. ही कोठडी आज संपली आहे. आज त्याला विशेष जिल्हा न्यायालयात हजर केले गेले.