भुसावळ : प्रतिनिधी
पोलिसांनी दाखल केलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावावर निर्णय घेत प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी चार जणांच्या हद्दपारीचे आदेश काढले आहे. त्यात दोन जणांना दोन वर्षासाठी तर दोघांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. यात अफताब शेख समीउल्लाह, रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ, सैयद आफताब सैयद अरमान, रा. गौसिया नगर याला एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. तर निंभोरा येथील नसीरशहा जनाब शहा फकीर आणि शेख मुश्ताक शेख अन्तर याला दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.
प्रांताधिकारी पाटील यांनी चार हद्दपारीच्या प्रस्तावावर निर्णय दिला. यात दोघांना दोन वर्षांसाठी तर दोघांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. उपद्रवींचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. भुसावळचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ, तालुका निरीक्षक महेश गायकवाड यांनी हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले.