जळगाव : प्रतिनिधी
हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकाचा मोबाइल लंपास करुन चोरटा पसार झाला. ही घटना शनिवार दि. १८ जानेवारी रोजी संध्याकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीजवळील एका हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील तरसोद येथील नारायण प्रकाश राजपूत (वय ३५) हे दि. १८ रोजी अजिंठा चौफुलीजवळील एका हॉटेलमध्ये आले होते. चोरट्यांने त्यांच्या जवळ येत सुमारे १८ हजार रुपयांचा मोबाईल तसेच सिमकार्ड असा ऐवज चोरुन हॉटेलमधुन पसार झाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणाने मोबाइलची शोधाशोध केली असता मिळाला नाही. काउंटवरही विचारणा केली. मात्र तपास लागला नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रारीनुसार रविवारी गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक प्रदीप चौधरी हे करीत आहेत