Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » घरात लग्नाची तयारी सुरु असतांना तरुणाने संपविले आयुष्य !
    क्राईम

    घरात लग्नाची तयारी सुरु असतांना तरुणाने संपविले आयुष्य !

    editor deskBy editor deskJanuary 21, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    आई-वडील शेतात गेले असताना घरी एकटाच असलेल्या खिलचंद पंडित कोळी (२२ वर्ष, रा. असोदा, ता. जळगाव) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि.२०) दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खिलचंदचा नुकताच साखरपुडा झाला असून, घरात त्याच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच त्याने टोकाचे पाऊल उचलले.

    मिळालेल्या माहितीनुसार, असोदा येथील खिलचंद कोळी हा तरुण शेती करून कुटुंबाला हातभार लावत होता. सोमवारी सकाळी त्याचे आई-वडील शेतात गेले असताना खिलचंद घरी एकटाच होता. त्याने घरात छताला गळफास घेतला. ही घटना परिसरात राहणाऱ्या तरुणाच्या लक्षात येताच त्याने खिलचंदच्या आई- वडिलांना माहिती दिली. ते घरी पोहोचले. ग्रामस्थांच्या मदतीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. खिलचंद याचा नुकताच साखरपुडा झाला होता. २२ एप्रिल रोजी त्याचे लग्न होणार होते. एकुलता एक मुलाच्या लग्नाची कुटुंबीयांकडून जोरदार तयारी केली जात होती. मात्र, त्यापूर्वीच त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.