वरणगाव : प्रतिनिधी
कार घेण्यासाठी पाच लाखांची मागणी केल्याप्रकरणी विवाहितेने तिच्या पतीसह सासरच्या मंडळींकडून मारहाण व छळ केल्याप्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, सुकन्या विशाल तायडे (२७) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार पती विशाल तायडे, सासू मीराबाई सुरेश तायडे, सासरे सुरेश बाजीराव तायडे, दीर सागर सुरेश तायडे, आकाश अरुण तायडे रा. नागपूर, कविता सुरेश तायडे (रा. भुसावळ), नणंद रेखा सुरेश तायडे, मनीषा भागवत सोनवणे, नंदोई भागवत वामन सोनवणे दोघे रा. भुसावळ, तसेच विलास बाजीराव तायडे, अरुण बाजीराव तायडे, व मीनाबाई अरुण तायडे रा. नागपूर यांच्या विरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार नागेंद्र तायडे करीत आहेत.