Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यात खळबळ : मुख्यध्यापकाने घेतली १ हजाराची लाच !
    क्राईम

    जिल्ह्यात खळबळ : मुख्यध्यापकाने घेतली १ हजाराची लाच !

    editor deskBy editor deskJanuary 20, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जिल्ह्यातील अनेक ठिकाणी लाच घेण्याच्या घटना घडत असतांना नुकतेच जळगाव एसीबीने एका मुख्याध्यापकाने लाच घेतल्याची घटना घडली आहे. शाळेचे इन्स्पेक्शन करत असताना पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी यांनी इन्स्पेक्शन मध्ये चांगल्या प्रकारे शेरा द्यावा, यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकाने प्रत्येक शिक्षकाकडून १ हजार रुपयांची मागणी केली. या संदर्भात जळगाव लाचलुचपत विभागाने कारवाई करत आज मुख्यध्यापकाला १ हजार रूपये घेत असतांना रंगेहात पकडले.

    मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे असलेल्या प्राथमिक शाळेची इन्स्पेक्शन सुरू आहे. दरम्यान शाळेचे इन्फेक्शन करत असताना शिक्षण विस्तार अधिकारी यांनी चांगला शेरा लिहावा म्हणून १० हजार रुपये मागितले आहेत, असे सांगून शाळेचे मुख्याध्यापक बळीराम सुभाष सोनवणे वय-५५, रा. एरंडोल यांनी शाळेतील प्रत्येक शिक्षकाकडून १ हजार रुपये असे एकूण १० हजार रुपयाची मागणी केली. दरम्यान यातील तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाला या संदर्भात तक्रार केली. सोमवारी लाच लुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून कारवाई करत शिक्षण विस्तार अधिकारी यांना पैसे देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून १ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. दरम्यान तक्रारदार यांनी १ हजार रुपये हे देत असताना लाच लुचपत पथकाने कारवाई करत मुख्याध्यापक बळीराम सोनवणे यांना रंगेहात पकडले. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी यांची फोनद्वारे पडताळणी केली असता त्यांनी २ हजार रुपये मिळाल्याबाबत विरोध दर्शवला नाही आणि नंतर कॉल करतो असे सांगून फोन ठेवला. दरम्यान या संदर्भात एरंडोल पोलीस ठाण्यात शाळेचे मुख्याध्यापक बळीराम सुभाष सोनवणे वय-५५ रा. एरंडोल आणि एरंडोल पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी जे.डी. पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

    यांनी केली कारवाई 
    ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोलीस नाईक बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने यांच्यासह पथकाने केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.