मेष : आज सकारात्मक विचाराने समस्यांवर तोडगा निघण्याचा मार्ग सापडेल. नवीन उर्जेने आपल्या कार्यवर लक्ष केंद्रीत कराल. न्यायालयात प्रकरण प्रलंबित असेल तर तुमच्यासाठी अनुकूल निकाल येण्याची शक्यता आहे. शेजार्यांशी वाद टाळा. भावांसोबतचे वाद शांततेने मिटवा. व्यवसायात परिस्थिती जैथे राहील.
वृषभ : धार्मिक आणि सामजिक कार्यात सहभागी व्हाल. अचानक मोठे खर्च निघाल्याने आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. मुलांच्या नकारात्मक कृतींने चिंता वाढण्याची शक्यता. व्यावसायिक कामासाठी प्रवास होईल. जोडीदारचे सहकार्य लाभेल.
मिथुन : आज ज्येष्ठांकडून मार्गदर्शन लाभेल. कौटुंबिक आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक टाळा. व्यवसायात मोठा लाभ होण्याची शक्यता कमी आहे. दैनंदिन दिनचर्या तुम्हाला निरोगी ठेवेल.
कर्क : आज कामाप्रती तुमचे समर्पण यश मिळवून देईल. कोणत्याही प्रकारचा वाद आणि धोकादायक कामे टाळा. प्रवासात अनोळखी व्यक्तीपासून लांब राहा. कुटुंबासोबत वेळ व्यतित केल्यास कामाचा ताण कमी होईल.
सिंह : आज तुम्ही आपल्या कार्यावर लक्ष केंद्रीत कराल. कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश कमवाल. विद्यार्थ्यांना यश लाभेल. कुटुंबातील सदस्यांच्या वैवाहिक जीवनातील मतभेदांमुळे तणाव निर्माण होईल. संवाद साधताना संयम कायम ठेवा. मुलांच्या समस्येवरुन पती-पत्नींमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे.
कन्या : आज ग्रहमान अनुकूल आहे. मुलांसंबंधी समस्येवर तोडगा निघाल्याने चिंता मिटेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. कोणत्याही बेकायदेशीर कृतीत सहभागी होवू नका. आज केलेले कठोर परिश्रमाचे भविष्यात उत्कृष्ट परिणाम मिळणार आहेत.
तूळ : आज सकारात्मक विचारांनी केलेल्या कार्याने तुम्हाला नवीन दिशा मिळेल. तरुणाई त्यांच्या करिअरबाबत गंभीर असतील. कोणावरही अतिविश्वासामुळे तुमचा अपेक्षाभंग होवू शकतो. कोणताही प्रवास टाळणे तुमच्यासाठी योग्य राहील. कोणत्याही अनुचित कामात रस घेऊ नका. व्यवसायात कठोर परिश्रमाची गरज आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
वृश्चिक : मागील काही दिवस अशक्य वाटणारे काम आज पूर्ण झाल्याने मनाला आनंद वाटेल. संपर्क क्षेत्रात वाढ करा. विद्यार्थ्यांना मुलाखतीत किंवा स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल. कोणाशीही वाद घालू नका. बाहेरील क्षेत्राशी संबंधित व्यवसाय चांगले यश मिळेल.
धनु : आज तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल कराल आणि चांगले परिणाम मिळवाल. प्रलंबित आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती थोडी सुधारेल. तुमच्याकडून कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या. धोकादायक कामे टाळा. सामाजिक उपक्रमांमध्येही तुमचा सहभाग असेल.
मकर : आज सर्वकाही नियोजनबद्ध करण्यावर तुमचा भर असेल. गुंतवणुकीशी संबंधित महत्त्वाच्या योजना यशस्वी होतील. घरात पाहुण्याच्या आगमनाने वातावरण आनंददायी असेल. कोणाशीही चर्चा करताना रागावर नियंत्रण ठेवा. केवळ चर्चेत वेळ व्यतित न करता कृतीवर भर देणे आवश्यक ठरेल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ अनुकूल आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
कुंभ : कोणतेही काम करण्यापूर्वी सर्व बाबी तपासून पाहिल्यास चांगले परिणाम मिळतील. उत्पन्न आणि खर्चात ताळमेळ राखला जाईल. हट्टीपणामुळे जवळच्या नातेवाईकासोबत संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. नातेसंबंधांच्या मर्यादांची जाणीव असणे महत्वाचे ठरेल. इतरांना जास्त शिस्त लावू नका. तुमच्या व्यवहारात लवचिकता आणा. एखाद्याचा चुकीचा सल्ला तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो.
मीन : आज घाई करण्याऐवजी शांतपणे तुमची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अहंकार आणि अति आत्मविश्वास तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. कठीण काळात जोडीदाराचे सहकार्य लाभेल. अनियमित दैनंदिन दिनचर्येचा आयोग्यावर परिणाम होईल.