• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात महिलेला नोकरी शोधणे पडले महागात : ५ लाखात लुटले !

editor desk by editor desk
January 19, 2025
in क्राईम, जळगाव
0
जळगावात महिलेला नोकरी शोधणे पडले महागात : ५ लाखात लुटले !

जळगाव : प्रतिनिधी

टास्क पूर्ण करून नफ्याचे आमिष दाखवत पहिल्या दोन टास्कवर नफा तर दिला, मात्र नंतर टास्क चुकीचा केल्याचे सांगत सोनल नितीन पाटील या ४० वर्षीय महिलेची पाच लाख २९ हजार ६१६ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ६ ते १४ जानेवारी दरम्यान घडला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळची पुणे येथील रहिवासी असलेल्या सोनल सध्या जळगावातील मनीषा कॉलनी परिसरात राहतात. चार जणांनी टेलिग्रामच्या एका ग्रुपमध्ये त्यांना सहभागी करून घेतले. महिलेला टास्कची माहिती देऊन त्यातून नफ्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यांनी दोन टास्क पूर्ण केल्यानंतर त्यांना नफा दिला; मात्र नंतर टास्क चुकीचा केल्याचे महिलेला सांगण्यात आले.

फसवणूक झालेल्या महिला दीड वर्षांपूर्वीच जळगावात रहायला आल्या. पूर्वी त्या एका फार्मा कंपनीत कामाला होत्या. आता त्या कामाच्या शोधत असल्याने त्यांनी त्यांचा बायोडाटा टेलीग्रामवर टाकलेला होता. सायबर गुन्हेगारांनी टेलीग्रामवरून महिलेशी संपर्क साधून घरबसल्या तुम्हाला टास्कचे काम दिले जाईल, असे सांगितले. त्यानुसार महिलेने होकार दिल्यानंतर टास्क देण्यात येऊ लागला व नंतर त्यांची फसवणूक करण्यात आली.

पहिल्या दोन टास्कवर नफा मिळाल्याने महिलेचा विश्वास बसला. त्यामुळे त्या दिलेला टास्क करू लागल्या; मात्र नंतर टास्क चुकीचा केल्याचा समोरील व्यक्तींनी दावा करीत त्यांच्याकडून रिकव्हरी म्हणून वेगवेगळ्या कारणांनी रक्कम वसूल करीत गेले. घेतलेल्या रकमेवर कोणताही मोबदला न देता ६ ते १४ जानेवारी दरम्यान वेळोवेळी त्यांच्याकडून एकूण पाच लाख २९ हजार ६१६ रुपये घेतले. युपीआय, बँक खाते, आरटीजीएस अशा वेगवेगळ्या माध्यमातून ही रक्कम स्वीकारण्यात आली. एवढी रक्कम देऊन मोबदला मिळत नसल्याने व मुद्दलही मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

आर्थिक व्यवहाराबाबत काही गैरसमज होण्‍याची शक्‍यता

Next Post

दोन दुचाकीची जबर धडक : ३३ वर्षीय तरुण ठार

Next Post
दोन दुचाकीची जबर धडक : ३३ वर्षीय तरुण ठार

दोन दुचाकीची जबर धडक : ३३ वर्षीय तरुण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group