मेष : आर्थिक गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे. घराच्या नुतणीकरणाविषयी चर्चा होईल. तुमच्या मार्गदर्शनाखाली मुलांना यश लाभेल. आळसामुळे तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या कामाप्रती समर्पित रहा. घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्यही चांगले राहील.
वृषभ : दिनचर्येत केलेल्या बदलामुळे मनशांती लाभेल. तुमच्याविषयी दुसरे काय बोलतात याकडे दुर्लक्ष करा.स्वत:च्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून निर्णय घ्या. मैत्राबरोबरील संबंध बिघडणार नाहीत, याबाबत काळजी घ्या. कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व राहील.
मिथुन : आज बहुतांशवेळ कुटुंबासोबत व्यतित कराल. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन होईल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. दुपारनंतर प्रतिकुल परिस्थितीचा सामना करावा लागेल. तरुणाईने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करावे. कामांची ठिकाणी समर्पित वृत्तीने कार्यरत राहा. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. अतिधावपळीमुळे शारीरिक थकवा जाणवेल.
कर्क : आर्थिक कामात यश लाभेल. प्रभावशाली व्यक्तीची भेट फायदेशीर ठरेल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. मुलांकडे दुर्लक्ष करणे नुकसानकारक ठरु शकते. पती-पत्नीमधील सुसंवाद कायम राहील. वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम होईल.
सिंह : आज मालमत्ता विक्री किंवा खरेदीसाठी अनुकूल वेळ आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम वाटेल. नातेसंबंध दृढ करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल. कुटुंबातील सदस्याच्या नकारात्मक बोलण्यामुळे घरातील वातावरणात निराशा येऊ शकते. ताणतणावाऐवजी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक प्रवास टाळा. पती-पत्नींच्या परस्पर सहकार्यामुळे घरातील वातावरण आल्हाददायक राहील. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या : आज सर्व कामे तुम्ही आत्मविश्वासपूर्वक कराल. तरुणाई करिअरबाबत गंभीर असेल. उत्पन्नाचा नवा मार्ग सापडेल. कुटुंबातील कोणतीही समस्या शांततापूर्वक विचार करुनच सोडवा. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.
तूळ : तुमच्या कामाला नवीन दिशा देण्यासाठी प्रयत्नशील असाल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश लाभेल. सासरच्या लोकांशी मतभेद टाळा. कोणत्याही परिस्थितीमध्ये संयम कायम ठेवा. वैयक्तिक कारणांमुळे व्यवसायाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता. आहारावर नियंत्रण ठेवा. मसालेदार अन्न टाळा.
वृश्चिक : आज बहुतांश कामे सुरळीत पार पडल्याने मनशांती लाभेल. तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळेल. आर्थिक व्यवहाराबाबत काही गैरसमज होण्याची शक्यता. एखाद्याशी वाईट बोलणे तुमच्यासाठी हानिकारक असू शकते. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. अतिश्रमामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल.
धनु : आज जवळच्या नातेवाईकांची झालेली भेट आनंददायी असेल. महत्त्वाच्या विषयावरील चर्चा फायदेशीर ठरेल. क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेण्याचा प्रयत्न करू नका. मानसिक शांतता कायम राखा. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचा तुमच्यावर पूर्ण पाठिंबा असेल.
मकर : आज काही लोक तुमच्या कामात अडथळा आणू शकतात, मात्र तुम्ही तुमच्या कामाप्रती समर्पित वृत्ती तुम्हाला यश मिळू शकते. वैयक्तिक आणि सामाजिक कामात व्यस्त राहाल. अति आत्मविश्वासाने नुकसान होईल. घरातील वडीलधाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आणि मार्गदर्शनानुसार काम करा. घरातील वातावरण आनंददायी राहील. रक्तदाब आणि मधुमेहींनी असणार्यांनी निष्काळजी राहू नये.
कुंभ : सामाजिक उपक्रमांमधील तुमचे निःस्वार्थ योगदानामुळे मनशांती लाभेल. व्यवसायात तुम्हाला काही नवीन यश मिळू शकते. घर आणि व्यवसायात योग्य सुसंवाद राखला जाईल. वडीलधाऱ्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करु नका.
मीन : तुमच्या कामांना नवीन आकार देण्यासाठी अधिक सर्जनशील दृष्टिकोन स्वीकारा. जवळच्या नातेवाईकाच्या वैयक्तिक जीवनात काही अडचणींमुळे चिंता असेल. आर्थिकदृष्ट्या दिवस उत्तम आहे. घरातील व्यवस्थेबाबत पती-पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात.