रावेर : प्रतिनिधी
मध्य प्रदेशातील सेंधवा पोलिसांनी रोख दोन हजार रुपये बक्षीस घोषित केलेल्या एका गुन्ह्यातील वॉण्टेड फरारी आरोपी महेंद्र भगवान राठोड हा पाल भागांमध्ये संशयास्पद स्थितीत रावेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्यास सेंधवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
म. प्र. तील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा पोलिस स्टेशनच्या गुन्ह्यातील फरार आरोपी महेंद्र भगवान राठोड हा पाल भागांमध्ये संशयास्पद स्थितीत फिरताना मिळून आल्याने रावेर पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता तो फरारी आरोपी असल्याचे आढळले. ही रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विशाल जयस्वाल, फौजदार तुषार पाटील, पोलिस हवालदार ईश्वर चव्हाण, पोलिस शिपाई महेश मोगरे, प्रमोद पाटील, तसेच माधुरी सोनवणे यांनी केली.