मुंबई : वृत्तसंस्था
अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून हल्ला केल्याप्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलिसांनी शुक्रवारी एका संशयिताला ताब्यात घेतले. पोलिस संशयिताची सुमारे 3 तासांपासून चौकशी करत आहेत. या प्रकरणात, गुरुवारी एका संशयिताचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले, जो १५ जानेवारी रोजी पहाटे २.३० वाजता सैफच्या घरात दिसला होता. यानंतर, आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले ज्यामध्ये वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ एक संशयित दिसला. दोन्ही संशयित एकच आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताच नाव शाहिद आहे, असं पोलिसातील सूत्रांनी सांगितलय. शाहीद याला गिरगाव परिसरातून ताब्यात घेतलय. शाहिदवर या आधी सुद्धा तीन-चार घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. हा सैफ अली खान प्रकणातील आरोपी आहे की नाही? हे पोलिसांनी अजून स्पष्ट केलेलं नाही. पण, आम्ही लवकरच हे प्रकरण उघडकीस आणू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय.
मुंबई पोलीस शाहिदची कसून चौकशी करतायत. मुंबईच्या ताडदेव पोलिसांनी फॉकलँड रोडवरील गिरगावमधून त्याला ताब्यात घेतलं.
पोलीस या प्रकरणात अत्यंत कसून चौकशी करत आहेत. कुठलाही अँगल सुटणार नाही, याची काळजी घेत आहेत. सैफच्या घरात काम करणारे नोकर-चाकर, इमारतीत कामाला येणारे मजूर या सगळ्यांची चौकशी सुरु आहे. CCTV फुटेजमध्ये जो चेहरा दिसला, तो हाच आरोपी आहे का? या बद्दल अजून अधिकृत माहिती पोलिसांनी दिलेली नाही. सैफच्या घरात हा आरोपी कसा घुसला? घरात घुसण्याची त्याची काही टेक्निक होती का? किंवा सैफच्याच घरातल्या कुठल्या माणसाने त्याला मदत केली? असे अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत. पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.