Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » डॉ. तेजपाल यांच्या कांदबऱ्यांवर गांधीवादी विचारसरणीचा मोठा प्रभाव – डॉ.ओमप्रकाश शर्मा
    जळगाव

    डॉ. तेजपाल यांच्या कांदबऱ्यांवर गांधीवादी विचारसरणीचा मोठा प्रभाव – डॉ.ओमप्रकाश शर्मा

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 18, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगांव प्रतिनिधी ;- ​डॉ. तेजपाल यांच्या कांदबऱ्यांवर गांधीवादी विचारसरणीचा मोठा प्रभाव दिसून येतो असे प्रतिपादन सुप्रसिध्द हिंदी साहित्यिक डॉ.ओमप्रकाश शर्मा यांनी केले.

    कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्राच्या हिंदी विभागाच्यावतीने आयोजित स्व. डॉ.तेजपाल चौधरी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ऑनलाईन राष्ट्रीय व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफतांना डॉ.ओमप्रकाश शर्मा बोलत होते.

    ​यावेळी डॉ.उर्मीला पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. शर्मा म्हणाले की, सत्य, अहिंसा, शिक्षण, स्त्रीयांचा सन्मान, स्वदेशी, सत्याग्रह अशा गांधी विचारांचा प्रभाव डॉ.चौधरी यांच्या साहित्यामध्ये दिसून येतो. हे विचार लादलेले नव्हते तर गांधी विचारांची सरमिसळ त्यांच्या व्यक्तीमत्वामध्ये झालेली होती. यावेळी डॉ.उर्मीला पाटील यांनी डॉ.चौधरी यांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. सुत्रसंचालन डॉ.विजय लोहार यांनी केले. प्रा.मनिषा महाजन यांनी आभार मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026

    ‘त्या’ पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक उपनिरीक्षक आले पोलिसांना शरण !

    March 10, 2026

    २२ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.